Ladki Bahin Yojana update
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. आता डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये लवकरच जमा होणार असं बोललं जातंय. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट आली आहे.
- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने चालवलेल्या माझी लाडकी बहीण योजनेची बरीच चर्चा झाली होती. या योजनेने भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे निवडणूक तज्ज्ञांचे मत आहे.
- जुलैमध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्यात आले. जुलै ते नोव्हेंबरचा हप्ता महिलांना मिळाला आहे. आता डिसेंबरचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
- निवडणुकीपूर्वी सरकारने या योजनेतून मिळणाऱ्या रकमेत विजयी झाल्यानंतर वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे या योजनेचा सहावा हप्ता डिसेंबरमध्ये येऊ शकतो, असे मानले जात आहे. यामध्ये पहिले मिळणाऱ्या 1500 ऐवजी 2100 रुपये मिळतील अशी माहिती आहे.
- बीजेपीचे नेता सुधीर मुनगंटीवार यांनी नुकत्याच न्यूज चैनलला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये या गोष्टीला दुजोरा दिला आहे. लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मिळणारे पैसे 1500 वरुन 2100 होतील का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, 100 टक्के पैसे वाढवून मिळतील. तसंच ही योजना देखील चालू राहील.
- या दरम्यान सुधीर मुनगंटीवार हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोलले आहे. ते म्हणाले की, ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं ते म्हणाले. यात कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही याविषयीही ते बोलले.
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा लाडक्या बहिणींना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये. तसंच ज्या महिला कर भरतात त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- ते हे देखील म्हणाले आहेत की, या योजनेसाठी जे यापूर्वी निकष आहेत, तेच कायम राहतील. त्यामुळे या निकषात न बसणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत.
निष्कर्ष | Ladki Bahin yojana update
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Ladki Bahin Yojana update : या महिलांचा अर्ज होणार आहे बाद, यामध्ये तुमचे नाव तर नाही ना? या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ
१.Ladki Bahin yojana update योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-या योजनेचा अर्ज https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या साईट वर जाऊन भरावा लागेल.
२. Ladki Bahin yojana update या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.
३. Ladki Bahin yojana update कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-आपल्या राज्यासाठी हि योजना लागू झाली आहे.
४. Ladki Bahin yojana update चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-या योजनेसाठी २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण या महिला लाभ घेऊ शकतात.
5. Ladki Bahin yojana update या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-महिन्याला 2१००/-रुपये या योजनेमार्फत महिलाना मिळणार आहे.
हे देखील वाचा.
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.