Kapus aani Soyabean Anudan Labharthi Yadi-कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादीझाली जाहीर, अशा प्रकारे पहा ऑनलाईन !

कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी (Kapus aani Soyabean Anudan Labharthi Yadi)झाली जाहीर, अशा प्रकारे पहा ऑनलाईन !


कापूस आणि सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी (Kapus aani Soyabean Anudan Labharthi Yadi) ऑनलाईन कशी पाहावी, याबाबत आपण सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारातील उलाढाली आणि इतर विविध अशा कारणांमुळे झालेल्या भावातल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने २०२३-२४ च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हे अनुदान केवळ ऑनलाईन माध्यमातून आणि सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरणाने (DBT) आधार लिंक्ड बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस जाणून घेऊयात ! Kapus Soybean Anudan Labharthi Yadi :-

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य योजनेसाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर प्रत्येक गावातील आणि पिकानुसार शेतकऱ्यांची भरलेली माहिती यावर उपलब्ध आहे.

कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन पाहण्यासाठी, खाली दिलेल्या सोयाबीन-कापूस अनुदान वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करून पोर्टल तुम्हाला येथे उघडता येईल.

https://uatscagridbt.mahaitgov.in/FarmerLogin/Login

कापूस व सोयाबीन अनुदान वेबसाईट ओपन झाल्यानंतर “Farmer Search” या बटनावर क्लिक करा.

Kapus aani Soyabean Anudan Labharthi Yadi
Kapus aani Soyabean Anudan Labharthi Yadi

यानंतर, Farmer Login या बटनावर क्लिक करून आधार क्रमांक टाका आणि आधार व्हेरिफाय करण्यासाठी “Get OTP for Aadhaar Verification” या पर्यायावर क्लिक करा.

Kapus aani Soyabean Anudan Labharthi Yadi
Kapus aani Soyabean Anudan Labharthi Yadi


तिथे ओटीपी टाकून खात्री करावी लागेल. त्यानंतर, राज्यातील सर्व विभागांतील कापूस आणि सोयाबीन अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांची यादी (Kapus aani Soyabean Anudan Labharthi Yadi) पाहण्यासाठी, आपला विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून सर्च बटणावर क्लिक करा.

या अनुदान लाभार्थी यादीत शेतकऱ्याचे नाव, सर्वे क्रमांक, खाता क्रमांक, पिकाचे नाव आणि शेतीचे क्षेत्र याबाबतची माहिती उपलब्ध तुम्हाला होईल.

कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी (Kapus aani Soyabean Anudan Labharthi Yadi)झाली जाहीर, अशा प्रकारे पहा ऑनलाईन !-कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय :-

सन २०२३ च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी १००० रुपये, तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्यांना क्षेत्रानुसार प्रति हेक्टर ५,००० रुपये (२ हेक्टरच्या मर्यादेत) अनुदान देण्यासाठी मंत्रिमंडळाने ११ जुलै २०२४ रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. त्यानुसार शासनाने निर्णय जारी केलेला आहे.

  1. सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हे देखील वाचा

Soybean cotton anudan 2024:सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी अर्ज सुरु
  1. २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धतीबाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा. इथे त्याच्या पोस्ट मध्ये जाऊन पीडीएफ डाऊनलोड करून इथे दे
  2. सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला रु.4194.68 कोटी निधी पैकी रु.2516.80 कोटी निधी सन २०२४-२५ मध्ये वितरीत करण्याबाबत शासन निर्णय पहायचा असेल तर इथे क्लिक करा.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली कापूस आणि सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी (Kapus aani Soyabean Anudan Labharthi Yadi) ऑनलाईन कशी पाहावी या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.