GI Tag to The Junnar Alphonso Mango | जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध ‘शिवनेरी हापूस’ आंबा नुकताच जीआय (जिओग्राफिकल इंडिकेशन) मानांकनाने नुकताच सन्मानित

GI Tag to The Junnar Alphonso Mango

जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध ‘शिवनेरी हापूस’ आंबा नुकताच जीआय (जिओग्राफिकल इंडिकेशन) मानांकनाने नुकताच सन्मानित झाला आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे मानांकन मिळविणे शक्य झाले आहे. जीआय मानांकनामुळे स्थानिक उत्पादनाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळते.

जीआय मानांकन म्हणजे काय ते जाणून घेऊ?

जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) हा एक प्रकारचा बौद्धिक संपदा हक्क आहे जो एखाद्या विशिष्ट भौगोलिक भागातील उत्पादनाला मिळतो. हे मानांकन त्या उत्पादनाच्या गुणवत्तेला, विशेष वैशिष्ट्यांना, व स्थानिक परंपरांना अधिकृत मान्यता प्रदान करते. जीआय टॅगमुळे त्या उत्पादनाला बाजारपेठेत एक वेगळी अशी ओळख निर्माण करते. आणि त्या प्रकारच्या बनावट उत्पादनांना यामुळे आळा बसतो. उदाहरणार्थ, हापूस आंबा, कोल्हापूरची चप्पल, दर्जिलिंग चहा, म्हैसूर सिल्क, म्हैसूर सॅंडल इत्यादी यांना त्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे ओळख मिळाली आहे.

‘शिवनेरी हापूस’चे विशेषत्व काय माहितीये का तुम्हाला?

शिवनेरी हापूस हा जुन्नर तालुक्यातील आंबा असून त्याचा स्वाद, सुगंध, आणि पोत यामुळे तो इतर हापूस आंब्यांपेक्षा वेगळा मानला जातो. जुन्नर भागातील अनुकूल असे हवामान, सुपीक जमीन आणि तेथील स्थानिक शेतकऱ्यांचे पारंपरिक ज्ञान यामुळे शिवनेरी हापूस आंब्याला ही खास ओळख मिळाली आहे.

GI Tag to The Junnar Alphonso Mango
GI Tag to The Junnar Alphonso Mango

जीआय मानांकनामुळे काय लाभ शेतकऱ्यांना मिळतात जाणून घेऊयात?

1. स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो – त्यांच्या उत्पादनाला अधिक दर मिळतो.

2. त्यांच्या प्रॉडक्टला जागतिक ओळख – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत यामुळे मागणी वाढते.

3. पर्यटनाला चालना मिळेल– जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्याबरोबरच स्थानिक आंब्याच्या प्रसिद्धीमुळे तेथे पर्यटक जास्त आकर्षित होतील.

4. बनावट उत्पादनांवर यामुळे नियंत्रण – स्थानिक शेतकऱ्यांचे हक्क यामुळे सुरक्षित होतील.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अथक प्रयत्नांमुळे स्थानिक शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. जीआय मानांकन मिळवण्यासाठी त्यांनी शासनाच्या विविध विभागांशी सातत्याने पाठपुरावा केला तसेच त्यांचे प्रबोधनही केले. याचा परिणाम, शिवनेरी हापूसला ही जागतिक जीआय मानांकनची मान्यता मिळाल्यामुळे जुन्नरचे नाव पुन्हा एकदा उजळले आहे.

GI मानांकनासाठी प्रक्रिया आता आपण समजून घेणार आहोत

1. तुमचा अर्ज सादर करा.

एखादा उत्पादक गट, सहकारी संस्था, किंवा आपले सरकार GI मानांकनासाठी अर्ज करते.

2. तांत्रिक पडताळणी.

तांत्रिक पडताळणी मध्ये उत्पादनाचे भौगोलिक वैशिष्ट्य, गुणवत्ता, व स्थानिक पारंपरिक घटक तपासले जातात.

3. आणि शेवटचा तिसरा पॉईंट म्हणजे मान्यता मिळवणे.

तपासणीनंतर उत्पादनाला GI टॅग दिला जातो, जो 10 वर्षांसाठी वैध असतो.

आता आपण GI Tag to The Junnar Alphonso Mango सारखी जी आय टॅग मिळालेली काही उदाहरणे बघुयात भारतीय आणि जागतिक उत्पादनांची.

1. भारतातील प्रसिद्ध GI उत्पादने

– रत्नागिरी हापूस आंबा

– नागपूर संत्री

– कांचीपुरम साडी

– तंजावूरची पेण्टिंग

2. जागतिक GI उत्पादने

– फ्रान्समधील शॅम्पेन

– इटलीचे पार्मेसन चीज

शिवनेरी हापूस आंब्याला मिळालेल्या जीआय मानांकनामुळे स्थानिक उत्पादनाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन मिळाले आहे. हा प्रकल्प स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यास उपयुक्त ठरेल आणि जुन्नर तालुक्याचे ऐतिहासिक व कृषी महत्त्व अधिक अधोरेखित केले जाईल.

शासनाची अधिकृत वेबसाईट येथे देत आहोत तुमच्या रेफेरंससाठी.

निष्कर्ष | GI Tag to The Junnar Alphonso Mango

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली GI Tag to The Junnar Alphonso Mango | जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध ‘शिवनेरी हापूस’ आंबा नुकताच जीआय (जिओग्राफिकल इंडिकेशन) मानांकनाने नुकताच सन्मानित, या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ | GI Tag to The Junnar Alphonso Mango.


१. GI Tag to The Junnar Alphonso Mango म्हणजे काय?

उत्तर -जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) हा एक प्रकारचा बौद्धिक संपदा हक्क आहे जो एखाद्या विशिष्ट भौगोलिक भागातील उत्पादनाला मिळतो. हे मानांकन त्या उत्पादनाच्या गुणवत्तेला, विशेष वैशिष्ट्यांना, व स्थानिक परंपरांना अधिकृत मान्यता प्रदान करते.

२. GI Tag to The Junnar Alphonso Mango याचा फायदा शेतकरी कसा घेऊ शकतात?

उत्तर- जीआय टॅगमुळे त्या उत्पादनाला बाजारपेठेत एक वेगळी अशी ओळख निर्माण करते, याचा फायदा शेतकरी घेऊ शकतात.

३. GI Tag to The Junnar Alphonso Mango सारखी जी आय टॅग मिळालेली काही उदाहरणे?

उत्तर- रत्नागिरी हापूस आंबा, नागपूर संत्री, कांचीपुरम साडी, तंजावूरची पेण्टिंग.

हे देखील वाचा


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.