Site icon yojanaguarantee.com

e Shram Card yojana 2024 | e Shram Card : UMANG पोर्टल वरून असे बनवा ई-श्रम कार्ड !

e Shram Card yojana 2024

e Shram Card yojana 2024

e Shram Card yojana 2024

ई-श्रम पोर्टलचे उद्दिष्ट हे असंघटित क्षेत्रातील कामगारांचा डेटा गोळा करून, या डेटाबेसच्या आधारे सरकार कामगारांसाठी कल्याणकारी योजना, धोरणे तयार करेल आणि भविष्यामध्ये रोजगाराच्या संधी यामुळे वाढतील. नोंदणी केल्यानंतर, कामगारांना एक ओळख क्रमांक (यूएएन कार्ड) दिले जाईल.

यू.ए.एन. कार्ड म्हणजे काय ? e Shram Card


ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर, अर्जदारांना एक यूएएन कार्ड प्रदान केले जाईल, ज्यामध्ये युनिक ओळख क्रमांक (यूआयएन) समाविष्ट असेल. या यूआयएनच्या मदतीने सरकारला कामगारांची माहिती एका जागी ठेवणे सोपे जाईल, जसे की रोजगारदाता, कौशल्ये, शैक्षणिक पात्रता, आणि विविध योजनांशी संबंधित तपशील जेव्हा पाहिजे त्यावेळी सहजपणे पडताळता येईल.

ई-श्रम किंवा यूएएन कार्डचे फायदे

भारत सरकार असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांच्या फायद्यासाठी अनेक योजना चालवते, परंतु ज्ञानाच्या अभावामुळे आणि त्यांच्या पर्यंत या योजना पोहोचत नसल्याकारणाने ते कल्याणकारी योजना आणि उपक्रमांसाठी अर्ज करण्याची संधी गमावतात.

ई श्रम कार्डचे (E Shram Card) फायदे खाली देत आहोत.

अर्ज फी

अर्जदारांना CSC ला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. जरी यूएएन कार्डमधील कोणत्याही प्रकारच्या डेटामध्ये सुधारणा करायच्या झाल्यास अर्जदाराला 20/- रुपये भरावे लागतात.

ई-श्रम किंवा यूएएन कार्डसाठी कोण अर्ज करू शकतो,

जे लोक असंघटित क्षेत्रात काम करत आहेत, ते ई-श्रम कार्डसाठी (E Shram Card) पात्र आहेत. खालील क्षेत्रात काम करणारे अर्जदार योजनेसाठी अर्ज करू शकतात.

  1. लहान आणि सीमांत शेतकरी
  2. कृषी श्रमिक
  3. सुतार, रेशीमपालन कामगार
  4. मीठ कामगार
  5. टॅनरी कामगार
  6. वीट भट्टी कामगार
  7. मच्छीमार, सॉ मिल कामगार
  8. पशुपालक Woker’s
  9. लेबलिंग आणि पॅकिंग
  10. इमारत आणि बांधकाम कामगार
  11. लेदर कामगार
  12. घरगुती कामगार
  13. नाई
  14. भाजी आणि फळ विक्रेते
  15. वृत्तपत्र विक्रेते
  16. रिक्षा ओढणारे
  17. ऑटो चालक
  18. सेरीकल्चर कामगार,
  19. घरकाम करणाऱ्या
  20. रस्त्यावर विक्रेते
  21. आशा कामगार
  22. दूध ओतणारे शेतकरी
  23. स्थलांतरित कामगार
ई-श्रम कार्डसाठी अर्ज कसा करावा?

ई-श्रम कार्डसाठी (E Shram Card) अर्ज करण्यास इच्छुक असलेले अर्जदार सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या CSC केंद्राला भेट देऊ शकतात किंवा स्वतः खालील लिंक वरून नोंदणी करू शकतात. अर्जदार असंघटित क्षेत्रात काम करत असावेत आणि वरील सर्व आवश्यक पात्रता निकष मध्ये पात्र असावेत.

UMANG पोर्टल वरून ऑनलाईन ई-श्रम यूएएन कार्ड बनवण्याची प्रोसेस खाली देत आहोत.

UMANG पोर्टल वरून ऑनलाईन ई-श्रम / यूएएन कार्ड (e Shram Card) बनवण्यासाठी खाली दिलेल्या पोर्टलला भेट द्या.

https://web.umang.gov.in

UMANG पोर्टलला भेट दिल्यानंतर नवीन युजर नोंदणी करून लॉगिन करा.

Login umang

UMANG पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर सर्च बार मध्ये E-Shram सर्च करावे. E-Shram सर्च केल्यानंतर Department मध्ये E-Shram पर्यायावर क्लिक करा आणि General Services मध्ये Registration वर क्लिक करा.

Registration

पुढे आपण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) किंवा कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) चे सदस्य आहात का? असे विचारले जाईल त्यामध्ये नाही (No) निवडून Next बटन वर क्लिक करा.

Self Registration

पुढे Self Registration मध्ये आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबर, आधार नंबर,OTP टाकून आधार प्रमाणीकरण करा आणि पुढे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरचा डेटा fetch होईल तो चेक करूंन I Agree वर क्लिक करा आणि Submit बटनावर क्लिक करावे.

वरील डेटा चेक केल्यानंतर पुढील तपशील भरावा.

वरील तपशील भरल्यानंतर Preview चेक करून I agree वर क्लिक करा आणि Download बटन वर क्लिक करा.

Download E Shram Card

अशा प्रकारे तुम्ही तुमचे ई-श्रम / यूएएन (E Shram Card) कार्ड UMANG पोर्टल वरून ऑनलाईन बनवू शकता.

निष्कर्ष :- e Shram Card yojana 2024

e Shram Card yojana 2024 | e Shram Card : UMANG पोर्टल वरून असे बनवा ई-श्रम कार्ड !, यामध्ये आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।

FAQ’s :-

१.e Shram Card yojana 2024 काय आहे ?

उत्तर – ई-श्रम पोर्टलचे उद्दिष्ट हे असंघटित क्षेत्रातील कामगारांचा डेटा गोळा करून, या डेटाबेसच्या आधारे सरकार कामगारांसाठी कल्याणकारी योजना, धोरणे तयार करेल आणि भविष्यामध्ये रोजगाराच्या संधी यामुळे वाढतील.

2. e Shram Card yojana 2024 कोणासाठी आहे ?

उत्तर – असंघटित क्षेत्रातील कामगारांकरिता आहे.


पुढील लेख देखील वाचावेत!

Home solar power generation new technology आता घरातच वीजनिर्मिती होणार ! नवीन सोलर सेल तंत्रज्ञान आले, जाणून घ्या तपशील.

SIP Mutual Fund Calculator 2024  केवळ 1000 रुपयांच्या मासिक TOP 10 SIP मध्ये गुंतवा व कमवा 3 कोटी - जाणून घ्या कसे.

शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना

आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना

Drone Subsidy Scheme in 2024 केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान: ड्रोन अनुदान योजना

महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. 

आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. 

Best Home Insurance Policies in 2024 सर्वोत्तम होम इन्शुरन्स योजना निवडण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन

Tractor Anudan Yojana apply Online 2024 ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 अर्ज प्रक्रिया – सविस्तर मार्गदर्शन

Exit mobile version