e Pik Pahani
e Pik Pahani : ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची माहिती कशी नोंदवावी? जाणून घ्या आमच्यासोबत !
महसूल विभागाने शेतकऱ्यांना ई–पीक पाहणी प्रकल्पांअतर्गत स्वतः पीक पेरा नोंदविण्याची सुविधा दिलेली आहे. या मोबाईल ॲपद्वारे शेतकरी पिकांची नोंद, बांधावरील झाडांची माहिती आणि चालू/कायम पड क्षेत्राची नोंद, अक्षांश व रेखांशासह सहजपणे करू शकतात.
या लेखात ई–पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंद कशी करावी याची सविस्तर माहिती दिली आहे.
पिकांची नोंद प्रक्रिया. | e Pik Pahani Nondani Prakriya.
शेतकऱ्यांनी प्रथम चालू/कायम पड क्षेत्राची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर ई–पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंद करता येईल. ॲप डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.
ई–पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करावे – ई–पीक पाहणी ॲप.
शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर, खाली दिलेल्या पद्धतींनुसार पिकांची नोंदणी करावी.
1. होम पेजवर नोंदणी टॅब निवडावा.
ॲप उघडल्यानंतर होम पेजवरील पीक माहिती नोंदवा या टॅबवर क्लिक करावे.
2. पिकांची नोंदणी या पेजवर या.
पीक पेरणीची माहिती भरा.
3.तुमचा खाते क्रमांक निवडावा.
आपली जमीन ओळखण्यासाठी खाते क्रमांक टाका.
4. तुमचा गट क्रमांक निवडा.
जमिनीचा भुमापन/गट क्रमांक निवडावा.
5. तुमच्या क्षेत्राबद्दलची माहिती आपोआप तुमच्यासमोर दिसेल.
निवडलेल्या गटाचे एकूण क्षेत्र (हे.आर) आणि पोट खराबा क्षेत्र आपोआप दाखवले जाईल.
6.तुमच्या समोर हंगाम निवडा हे बटन दिसेल.
हंगाम निवडा या बटणावर क्लिक करा आणि सध्या चालू असलेला हंगाम किंवा संपूर्ण वर्ष यापैकी आपल्याला लागू असलेला पर्याय तेथे टाकावा.
7. उपलब्ध क्षेत्र तपासावे.
पीक पेरणीसाठी उपलब्ध असलेले क्षेत्र आपोआप दाखवले तेथे जाईल.
8. पिकांचा वर्ग काय आहे तो निवडा.
निर्भेळ पिक, मिश्र पिक, पॉलीहाऊस पिक, किंवा शेडनेटहाऊस पिक यापैकी आवश्यक तो पर्याय निवडावा.
9. पिकाखालील जेवढे क्षेत्र असेल ते भरावे.
क्षेत्र भरा, या ठिकाणी निवडलेल्या पिकासाठी लागवड केलेले क्षेत्र हे.आरमध्ये भरावे.
10. जल सिंचनाचे साधन काय असेल ते निवडा.
जल सिंचनाची साधने या पर्यायावर क्लिक करून यादीतील नावानुसार निवडा.
11. त्यानंतर जल सिंचन पद्धती हा पर्याय शोधा आणि आपल्याला आवश्यक असलेला पर्याय सिलेक्ट करावा.
12. त्यानंतर लागवडीचा दिनांक या दिसणाऱ्या पर्यायावर क्लिक करा. कॅलेंडर उघडेल, त्यामधून पिकाच्या पेरणीचा किंवा लागवडीचा दिनांक निवडा.
13. अक्षांश व रेखांश मिळवा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अक्षांश, रेखांश यांची माहिती मिळेल.
14. अधिक अचूकता मिळवण्यासाठी तुमचा मोबाईल एरोप्लेन मोडवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
15. नंतर फोटो काढा या पर्यायावर क्लिक करून पिकाचा फोटो घ्यावा.
जर तुम्ही निवडलेल्या गटापासून दूर असाल, तर खालीलप्रमाणे संदेश तुम्हाला दिसू शकतो.
मध्यापासूनचे अंतर ३९४.७९ मी. आपण निवडलेल्या गटापासून तुम्ही दूर आहात, तर कृपया गटाच्या जवळ जाऊन फोटो घ्या.
अशा परिस्थितीत गटाच्या जवळ जाऊन फोटो काढणे आवश्यक आहे.
16. जर तुम्ही शेताच्या बांधावर असूनही असा संदेश दिसत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करून पिकाचा फोटो घ्यावा.
17. फोटो काढल्यानंतर बरोबर या चिन्हावर क्लिक करावे. त्यानंतर माहितीची खात्री केल्यानंतर अशी स्क्रीन उघडेल.
18. दिलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करा आणि मी माहिती अचूक असल्याचे घोषित करत आहे या घोषणापत्रावर क्लिक करावे. नंतर पुढे जा या बटनावर क्लिक करुन पुढच्या प्रोसेस कडे वळावे.
19. जर माहितीमध्ये बदल करायचा असल्यास, रद्द या बटनावर क्लिक करा. मागील स्क्रीनवर जाऊन आवश्यक ती दुरुस्ती करून पुन्हा प्रक्रिया पूर्ण करा.
20. तुम्ही नेटवर्कमध्ये असल्यास, नोंदविलेली माहिती सबमिट व अपलोड झाल्याचा संदेश दिसेल.
21. नेटवर्क नसल्यास, माहिती सबमिट होईल पण अपलोड होणार नाही. नेटवर्कमध्ये आल्यानंतर होमपेजवरील अपलोड पर्यायाचा वापर करून माहिती अपलोड करावी.
e Pik Pahani
मिश्र पीक नोंदणी प्रक्रिया जाणून घेऊयात (e Pik Pahani)
१) ई-पीक पाहणी अॅपमध्ये मिश्र पीक पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. येथे एक मुख्य पीक आणि तीन दुय्यम पिकांची नोंद तुम्हाला करता येईल.
२) खाते क्रमांक आणि गट क्रमांक निवडल्यानंतर तुम्हाला पिकाचा वर्ग – मिश्र पीक असा निवडावा लागेल.
३) मुख्य पिकाची माहिती (पिक कोणतं आहे, क्षेत्रफळ, लागवडीची तारीख) येथे भरावी.
४) त्यानंतर दुय्यम पीक १, दुय्यम पीक २ आणि दुय्यम पीक ३ यांची नोंद एकामागून अशा पद्धतीने करावी.
५) जल सिंचनाचे साधन व पद्धती तुम्हाला निवडावी लागेलं. उपलब्ध पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडावा.
६) लागवडीचा दिनांक निवडा आणि पिकाच्या पेरणीचा दिनांक कॅलेंडरमधून निवडा व येथे टाका.
७) अक्षांश व रेखांश मिळवा या पर्यायावर क्लिक करून अचूक स्थान मिळवा. अधिक अचूकतेसाठी तुमचा मोबाईल एरोप्लेन मोडवर ठेवा.
८) फोटो काढा या पर्यायावर क्लिक करून पिकाचा फोटो घ्या.
९) दिलेली सर्व माहिती तपासून, माहिती योग्य असल्याचे घोषित करत आहे या घोषणापत्रावर क्लिक करून पुढे जा या बटनावर क्लिक करा.
१०) जर माहितीमध्ये बदल आवश्यक असल्यास, रद्द या पर्यायावर क्लिक करून मागील स्क्रीनवर जाऊन आवश्यक ती दुरुस्ती करावी.
११) नेटवर्कमध्ये असल्यास, नोंदवलेली माहिती तुम्हाला सबमिट आणि अपलोड झाल्याचा संदेश मिळेल.
१२) नेटवर्क उपलब्ध नसल्यास, माहिती सबमिट होईल पण अपलोड होणार नाही. नेटवर्कमध्ये आल्यानंतर तुम्हाला अपलोड पर्याय दिसेल तो वापरा.
पॉलीहाऊस व शेडनेट हाऊससाठी वरीलप्रमाणेच पॉलीहाऊस व शेडनेट हाऊस पिकांची नोंदणी प्रक्रिया करा.
महत्वाची माहिती.
नोंदणीसाठी नेटवर्कची आवश्यकता नाही. माहिती सबमिट केल्यानंतर ती मोबाईलमध्ये साठवली जाईल. नेटवर्क मिळाल्यानंतर अपलोड पर्यायाद्वारे ती अपलोड करू शकता.
अॅपमधील मदत टॅब किंवा अभिप्राय नोंदवा पर्याय वापरून प्रश्नांचे निराकरण आणि अभिप्राय नोंदवू शकता.
ई-पीक पाहणी अॅपद्वारे शेतकऱ्यांसाठी पिकांची नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ आहे. योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) संकेतस्थळावर सरकारी योजनांच्या अद्ययावत माहितीसाठी नियमित भेट द्या.
निष्कर्ष | e Pik Pahani.
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली e pik pahani | मागेल त्याला सौर कृषी पंप योजना-, हे घ्या जाणून आमच्या सोबत. याबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा, धन्यवाद|
FAQ | e Pik Pahani.
१. e Pik Pahani योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-ई–पीक पाहणी ॲप वापरून तुम्ही करून ई–पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करावे – ई–पीक पाहणी ॲप.
२. e Pik Pahani या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- ई–पीक पाहणी ॲप. यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला तय्च्ये App मिळेल.
३. e Pik Pahani कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-आपल्या राज्यातील सर्व नागरिकांसाठी हि योजना लागू झाली आहे.
5. e Pik Pahani या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर – यामुळे शेती संदर्भातील योजनांचा लाभ घेता येईल.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.