AICTE Scheme 2024:सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024
आपल्या भारत देशात ग्रामीण भागातील मुले जेव्हा शहरी भागात राहिला जातात. तेव्हा त्यांच्या कॉलेजच्या फी आणि बाकीच्या फीस त्याचा खर्च खूप असतो.तर आज आपण एका अशा योजनेबद्दल जाणून घेऊयात जी बीई ,बीटेक,डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना आहे. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन(AICTE) या संस्थेमार्फत जे विद्यार्थी बीई किंवा बी टेक करत आहेत,त्यांच्या साठी शिष्यवृत्ती योजना आहे.तुम्ही जर हे शिक्षण घेत असाल तर आजच अर्ज करू शकतात.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दोन वेगवेगळ्या स्कॉलरशिप भेटतात एक आहे ए.आई. सि.टी. प्रगती स्कॉलरशिप आणि दुसरी आहे ए.आय.सी.टी.ई. सक्षम स्कॉलरशिप.आज जाणून घेऊया सक्षम स्कॉलरशिप बद्दल.
ही योजना आपल्या केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स डिपार्टमेंट मार्फत चालवली जाते.या योजनेद्वारे डिप्लोमा आणि इंजीनियरिंग या दोन्हीही व्यावसायिक शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली जाते. या योजनेमुळे आपल्या तरुण वर्गाचे स्वप्न पूर्ण होणार आहेत व एक आदर्श इंजिनियर आपल्या देशात घडणार आहेत. जे अपंग विद्यार्थी हालाखीच्या परिस्थितीमुळे आपले शिक्षण पूर्ण करण्यास घाबरतात त्या विद्यार्थ्यांसाठी जीवन संजीवनी ठरणार आहे.
या योजनेद्वारे प्रत्येक वर्षाला विद्यार्थ्यांना 50 हजार स्कॉलरशिप म्हणून दिली जाणार आहे. चार वर्षापर्यंत विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.आपल्या देशातील 500 विद्यार्थी डिप्लोमा व 500 विद्यार्थी डिग्रीचे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेद्वारे ज्या विद्यार्थ्यांना शारीरिक व्यंग आहे असे विद्यार्थी आपल्या व्यंगानुसार सॉफ्टवेअर विकत घेऊ शकतात किंवा आपल्याला हवे ते उपकरणे घेऊ शकता त्यासाठी दोन हजार रुपये प्रत्येक वर्षाला 10 महिन्यासाठी दिले जाणार आहेत.
सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024 या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024 ची ठळक मुद्दे :- {Important Points of AICTE Scheme 2024 }
सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024 ची ठळक मुद्दे :- {AICTE Scheme 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024:AICTE Scheme 2024 |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | केंद्र सरकार |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या देशातील डिप्लोमा आणि इंजिनीरिंग करणारे अपंग विद्यार्थी |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | विद्यार्थ्यांना डिप्लोमा करत असतील तर 50000/- रुपये प्रति वर्ष आणि इंजिनिअरिंगच्या चार वर्षासाठी 50000/- रुपये प्रति वर्ष असा लाभ होणार आहे |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024:AICTE Scheme 2024 |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन |
सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024 या योजनेची फायदे (Benefits of AICTE Scheme 2024 ):-
- या योजनेद्वारे अर्जदाराला 50000/- रुपये तीन वर्षासाठी डिप्लोमा कोर्स आणि 50000/- रुपये चार वर्षाच्या इंजिनिअरिंग कॉलेज साठी दिले जाणार आहेत.
- या योजनेद्वारे अर्जदाराला कॉलेजमध्ये जागा ठेवण्यात येणार आहेत.
- याद्वारे गव्हर्मेंट जॉब देखील मिळू शकतो.
- तसेच या योजनेत अर्ज करणाऱ्या अर्जदाराला होस्टेलमध्ये राहण्याची संधी मिळणार आहे बाकीच्या खर्चासाठी देखील पैसे दिले जाणार आहेत.
सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024 या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for AICTE Scheme 2024 ) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
- अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- दहावी व बारावीचे मार्कशीट
- अपंगत्वाची सर्टिफिकेट
- ऍडमिशन घेतल्याचे लेटर
- ऍडमिशन घेतल्याचे सर्टिफिकेट
- फी भरण्याची पावती
- कॉलेज आयडी कार्ड
- आई-वडिलांचे घोषणापत्र
सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024 या योजनेची पात्रता (Eligibility for AICTE Scheme 2024 ) :-
- अर्जदार भारताचा रहिवासी असावा.
- अर्जदाराने ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अप्रुड असणाऱ्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर डिप्लोमा अथवा इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेतलेले असावे.
- तुमच्याकडे 40% अपंगत्वाचा किंवा व्यंगाचा दाखला असावा.
- अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- ऍडमिशन घेतलेले असताना आपल्याला जर आपल्याला जर ड्रॉप लागलेला असेल तर आपण या स्कॉलरशिप साठी अर्जदार राहणार नाही आपल्याला पुढच्या वर्षी परत अप्लाय करावा लागेल.
- डिप्लोमा अथवा डिग्री च्या ऍडमिशन साठी दोन पेक्षा जास्त वर्षाचा गॅप असणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेद्वारे अर्ज भरता येणार नाही.
- या योजनेचा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारच्या स्कॉलरशिपचा फायदा घेतलेला नसावा.
सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024 या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for AICTE Scheme 2024 ) :-
या योजनेचा अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे त्यासाठी खालील माहिती वाचा-
सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024 या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला खालील ऑफिशियल वेबसाईटवर जाणे गरजेचे आहे.
- आता आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन टॅब वर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन भरून रजिस्टर करायचा आहे.
- रजिस्ट्रेशन झाल्यावर आपल्याला लॉगिन बटन वर क्लिक करायचे आहे.
- आपल्यासमोर एक अर्ज ओपन होईल त्यावर आपल्याला इन्फॉर्मशन व्यवस्थित भरायची आहे
- वरती दिलेली सर्व कागदपत्रे या अर्जासोबत जोडायचे आहेत.
- सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
आशा आहे आपल्याला हा लेख आवडला असेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जे इंजिनिअरिंग व डिप्लोमा चे विद्यार्थी आहे व ज्यांना आर्थिक दृष्ट्या या शिष्यवृत्तीची गरज आहे त्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती चा फायदा घेऊ शकतो.
FAQ :-
१. सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-या योजनेचा अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे.
२. सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://scholarships.gov.in/
३. सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-योजना केंद्र सरकारच्या असल्यामुळे ती सर्व राज्यांसाठी लागू झाली आहे.
४. सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024 चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-या योजनेचा लाभ डिप्लोमा व इंजीनियरिंग मध्ये शिकणारे विद्यार्थी घेऊ शकतात.
5. सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024 या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-प्रति वर्ष ५० हजार रुपये आर्थिक मदत म्हणून या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना केले जाणार आहे.
6. सक्षम शिष्यवृत्ती योजना 2024 या योजनेचा उद्देश काय आहे ?
उत्तर-आपल्या देशातील अपंग विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजीनियरिंग चा खर्च परवडणारा नसतो त्यासाठी आपली केंद्र सरकार अशा विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये वार्षिक मदत करून त्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यास मदत करत आहे याद्वारे आपल्या देशासाठी आदर्श इंजिनियर घडतील व आपल्या देशाच्या विकासाला मोलाचा हातभार लागेल.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.