Site icon yojanaguarantee.com

Agri Clinic’s and Agri Business Centre’s scheme 2024 | कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजना

Agri Clinic's and Agri Business Centre's scheme 2024

Agri Clinic's and Agri Business Centre's scheme 2024

Agri Clinic’s and Agri Business Centre’s scheme 2024

कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजना (Agri Clinic and Agri Business Centres Scheme – pm yojana maharashtra) ही योजना भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे. राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (MANAGE) आणि NABARD नाबार्डच्या सहकार्याने ही योजना राबविण्यात येते. शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित पदवीधरांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांना सल्ला व विस्तार या सेवा पुरविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

Agri Clinic’s and Agri Business Centre’s scheme ची उद्दिष्टे जाणून घेवूयात.

  1. स्वयंरोजगाराला चालना देणे – कृषी पदवीधरांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरित करणे व शेतकऱ्यांना शेतीबद्दल सल्ला सेवा पुरविणे.
  2. कृषी उत्पादकतेत वाढ करणे- आधुनिक तंत्रज्ञान, कीड नियंत्रण, पाणी व्यवस्थापन आणि मातीचे आरोग्य यावर शेतकऱ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.
  3. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे- ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे.

पात्रता काय ते माहिती करून घेवूयात.

  1. कृषी व कृषी संबंधित विषयांमध्ये पदवी. (हॉर्टिकल्चर, प्राणी संवर्धन, मत्स्यपालन, दुग्धशास्त्र, वनीकरण, पशुवैद्यकीय विज्ञान).
  2. कृषी विज्ञानातील डिप्लोमा धारक.
  3. कृषी विषयात शिक्षण किंवा तसा अनुभव असलेले जीवशास्त्र पदवीधर.

Agri Clinic’s and Agri Business Centre’s scheme ची महत्त्वाची वैशिष्ट्ये

प्रशिक्षण कार्यक्रम

    आर्थिक मदत

      समर्थन सेवा

        शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे फायदे

        1. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आधुनिक पद्धतीची शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळते.
        2. स्वस्त दरामध्ये शेतीसाठी आवश्यक सामग्री आणि सेवा.
        3. आधुनिक तंत्रज्ञान व चांगल्या पद्धती स्वीकारण्यासाठी मदत केली जाते.

        योजनेअंतर्गत कोणते व्यवसाय प्रकार येतात ते बघुयात.

        1. माती परीक्षण प्रयोगशाळा.
        2. कीड नियंत्रण सेवा.
        3. कृषी सामग्री विक्री केंद्र.
        4. वर्मीकंपोस्ट उत्पादन युनिट्स.
        5. कस्टम हायरिंग सेंटर (यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर देणे).

        अर्ज कसा करावा?

        1. मॅनेजच्या वेबसाईट ला भेट द्या. https://www.manage.gov.in/
        2. जवळच्या नोडल प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी नोंदणी करा.
        3. प्रशिक्षणानंतर प्रकल्प अहवाल तयार करावा आणि कर्ज व अनुदानासाठी बँकेशी संपर्क साधा.

        ही योजना कृषी पदवीधरांसाठी ग्रामीण उद्योजक बनण्याची उत्तम संधी निर्माण करते. त्याचबरोबर, शेतकऱ्यांना शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान व चांगल्या पद्धतींचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन देखील देते.

        Agri Clinic’s and Agri Business Centre’s scheme 2024

        कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन येथे देत आहोत.

        योजनेसाठी पात्रता तपासा.
        कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणत्याही श्रेणीत मोडत आहातते जाणून घ्या-

          अर्ज करण्यापूर्वी करायच्या गोष्टी.

            आवश्यक कागदपत्रे-

            1. शैक्षणिक प्रमाणपत्रे.
            2. ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड).
            3. राहता पुरावा (रहिवासी प्रमाणपत्र, लाईट बिल).
            4. फोटो आणि सही.
            5. जर तुमच्याकडे प्रकल्पाचा आराखडा असेल तर त्याचा अहवाल.

            आवश्यक माहिती.

            1. तुमच्या व्यवसायाचे उद्दिष्ट.
            2. तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा आहे, वर नमूद केलेल्यांमध्ये.
            3. अंदाजे खर्च किती येईल.

            अर्ज प्रक्रिया

              (अ) प्रशिक्षणासाठी नोंदणी करा.

              1. मॅनेजच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
                https://www.manage.gov.in/ACABC/
              2. नोंदणी फॉर्म भरा.
              1. प्रशिक्षणासाठी सहभागी व्हावे.

              (ब) प्रकल्प प्रस्ताव Project तयार करा.

              प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करावा लागेल. यामध्ये,


              (क) आर्थिक मदतीसाठी अर्ज करा.

              1. बँकेशी संपर्क साधा.
              1. अनुदानाचा लाभ-

              व्यवसाय सुरू करा


                मदतीसाठी संपर्क


                १. जर अर्ज प्रक्रियेदरम्यान अडचण आली तर खालील ठिकाणी मदत मिळू शकते.

                संपर्क क्रमांक: 040-24594509

                ईमेल- directoracabc@manage.gov.in

                २. नोडल प्रशिक्षण संस्था-


                  निष्कर्ष :- Agri Clinic’s and Agri Business Centre’s Scheme 2024 | GOVT. SPONSORED SCHEMES

                  Agri Clinic’s and Agri Business Centre’s scheme | कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजना, या योजनेमध्ये आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।

                  FAQ’s :-

                  १. Agri Clinic’s and Agri Business Centre’s Scheme 2024 काय आहे ?

                  उत्तर – शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित पदवीधरांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांना सल्ला व विस्तार या सेवा पुरविणे.

                  २. Agri Clinic’s and Agri Business Centre’s Scheme 2024 या योजनेमध्ये शेतकर्यांना काय मिळते ?

                  उत्तर – 45 दिवसांचे निवासी प्रशिक्षण, लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या 36% अनुदान, अनुसूचित जाती/जमाती, महिला आणि विशेष श्रेणीतील लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या 44% अनुदान.

                  ३. Agri Clinic’s and Agri Business Centre’s Scheme 2024 कोणासाठी आहे ?

                  उत्तर – कृषी व कृषी संबंधित विषयांमध्ये पदवी, कृषी विज्ञानातील डिप्लोमा धारक ,कृषी विषयात शिक्षण किंवा तसा अनुभव असलेले जीवशास्त्र पदवीधर


                  पुढील लेख देखील वाचावेत!

                  Home solar power generation new technology आता घरातच वीजनिर्मिती होणार ! नवीन सोलर सेल तंत्रज्ञान आले, जाणून घ्या तपशील.

                  SIP Mutual Fund Calculator 2024  केवळ 1000 रुपयांच्या मासिक TOP 10 SIP मध्ये गुंतवा व कमवा 3 कोटी - जाणून घ्या कसे.

                  शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना

                  आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना

                  Drone Subsidy Scheme in 2024 केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान: ड्रोन अनुदान योजना

                  महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. 

                  आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.

                  मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. 

                  Best Home Insurance Policies in 2024 सर्वोत्तम होम इन्शुरन्स योजना निवडण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन

                  Tractor Anudan Yojana apply Online 2024 ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 अर्ज प्रक्रिया – सविस्तर मार्गदर्शन

                  Exit mobile version